Followers

Friday, 4 May 2018

लालकिल्ला

देश स्वतंत्र झाल्या पासुन लाल किल्ला सांभाळण्यासाठी कॉंग्रेस २० करोड रुपये दर वर्षी इमामांना द्यायची वरुन पर्यटकांकडुन आलेल उत्पन्न ( जवळपास प्रतीवर्ष १० कोटी ) ते देखील इमामच घ्यायचे , म्हणजे आपण मेहनत करुन टॅक्सच्या स्वरुपात जो पैसा सरकारला द्यायचो तो पैसा पुर्विचे सरकार अश्या पद्धतीने उडवायचे!
त्या ऐवजी मोदीसरकारने लालकील्ल्याच्या देखभालीसाठी टेंडर काडुन देशाचे २५ कोटी वाचवले!!!
यात सरकारच काय चुकले ?

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर सर्व राजेशाही संस्थाने संपुष्टात आली .
पुढे इंदीरा गांधी यांनी या सर्व सवलती बंद केल्या व सर्व राजवाडे किल्ले हे सरकारजमा केले त्याची देखभाल उत्पन्न हे सरकार ( पुरातत्व विभाग) कडे घेतल्या गेले!!!

#परंतु राजीव गांधी सरकारने लाल किल्ल्याच्या देखरेखीच्या नावाखाली लालकिल्ल्ला शाही इमामला बहाल केला आणि वरुन ३ कोटी प्रतिवर्षा प्रमाणे त्याला खर्च पण दिल्या जात होता वरुन पर्यटन इतर गोष्टींच्या माध्यमातले उत्पन्न ( शपथग्रहण सोहळे , १५ ऑगस्ट , २६ जानेवारी याच वार्षिक उत्पन्नच वर्षाच १० कोटी होते ) हे पण इमाम घ्यायचा
मोदिंनी हे सर्व बंद करुन टेंडर पद्धत चालु केली
आता देशाची जवळपास प्रतिवर्षी २५ कोटिंची बचत होणार आहे , म्हणजे जो किल्ला सरकारच्या मालकीचा असुन सुद्धा सरकार इमामांना पैसे देत होते ते मोदी सरकारने बंद करुन उलट टेंडरच्या माध्यमातुन पैशांची उधळपट्टी थांबवली आहे!!!

मोदीजीच्या या निर्णयाने काँग्रेस व मुस्लिम प्रेमी लोकांच्या पोटात दुखायला लागले. पण आश्चर्य म्हणजे देशातील असंख्य मुर्खही विनाकारण टीका करु लागले ...

Saturday, 12 August 2017

60 innocent

*साठ सरकारी मर्डर..*

गोरखपूर सिव्हिल मध्ये ऑक्सिजन संपला म्हणून साठ कोवळ्या जीवांचा बळी गेला.. वाचून कोणीही सेन्सिटिव्ह माणूस सुन्न होईल अशीच ही घटना आहे.. जे कोणी या घटनेवर सरकारच्या बाजूने एक्सक्युजेस देतील ते लोक "माणूस" म्हणायच्या लायकीचेच नव्हेत..

आणि, अशा 'माणूस' नसलेल्यांसाठी हा लेख..

गोरखपूर मधील घटना ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं, पण आश्चर्य मात्र अजिबात वाटलं नाही..

आज कोणतंही सिव्हिल हॉस्पिटल बघा.. क्षमतेपेक्षा ओसंडून वाहत आहे.. खाटांची संख्या तिथे येणाऱ्या पेशंट्स च्या संख्येशी कुठंच ताळमेळ खात नाही.. गाऱ्हाण्यांची लिस्ट काढायची म्हटलं तर पेनातली शाई संपेल..

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात.. पण, शहाण्याने सरकारी हॉस्पिटलचीही पायरी चढू नये, हे ही तितकंच खरं आहे..

पुरेसे डॉक्टर, नर्स, कर्मचारी नसतात.. वार्डबॉय नसतात.. आणि असले तरी ते काम करत नसतात.. टंगळमंगळ सुरू असते.. पेशंटच्या अंगावर खेकसणे एवढंच त्यांचं दिवसभराचं काम असतं.. आपल्यापैकी कोणी कोणत्याही सरकारी हॉस्पिटलचा अनुभव घेतला असेल तर जरा आठवा, सौजन्याची वागणूक तुम्हाला किती वेळा मिळलीये..? आणि चुकून एखादा सिव्हिलमधला कर्मचारी सौजन्याने बोललाच् तर भीती वाटते, की हा आता पैसे मागतोय की काय!!
बाय चॉईस म्हणून नव्हे तर मजबुरी म्हणूनच सरकारी दवाखान्यात जातो प्रत्येक जण..

सरकारी दवाखान्यातली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे औषधांची उपलब्धता..!!

टेंडर निघून ही औषधखरेदी केली जाते.. मात्र कुठल्यातरी विचित्र फर्मास्युटिकल कंपन्याची नावे असतात त्या गोळ्यावर.. अत्यंत सुमार दर्जा.. बऱ्याच वेळा डॉक्टरलाही समजत असतं की ह्या गोळ्यांनी पेशन्ट काही बरा होणार नाहीये.. पण पर्यायच् नसतो.. त्याला महागातली पण चांगली औषधे डॉक्टर लिहून देऊ शकत नाही, (लिहून दिल्यास खूप बोंबाबोंब होते) आणि पेशन्ट पण तसे अफोर्डिंग नसतात..

बऱ्याच औषधांचं एकदमच बल्क पर्चेसिंग होतं.. मग फतवा निघतो, अँम्पीसिलिनचा खूप स्टॉक आलाय, आता महिनाभर एकच अँटिबायोटिक वापरायचं कारण (नवीन पर्चेस केलेल्या औषधाचीच्) एक्सपायरी डेट जवळ आलेली असते.. कधी खूप सारा स्टॉक असाच एक्सपायर होऊन जातो, मग त्याची गुपचूप विल्हेवाट लावली जाते..

Requirement चा आणि availability चा काहीही संबंध नसतो.. तुम्ही कधीही requirement पाठवा, ते औषध पाठवायचं तेंव्हाच पाठवितात आणि हॉस्पिटलला मिळायचं तेंव्हाच मिळतं.. डॉक्टरच्या हातात यातलं काहीही नसतं..

एक खूप जुना किस्सा सांगतो, माझ्या एका PHC ला मेडिकल ऑफिसरशीप नुकतीच घेतलेल्या मित्राला मी कामानिमित्त भेटायला गेलो होतो.. तो निराश दिसला.. मी म्हटलं, 'काय झालं रे?' तर म्हणाला, आज दिडशेची ओपीडी केलीय.. मी म्हणालो, मग? तर तो म्हणाला, "काही नाही रे.. सगळ्यांना Ranitidin, Gelusil, MVBC आणि cough syrup आलटून पालटून दिलेय, आजार काहीही असो.. हीच औषधं शिल्लक आहेत.. आणि आता मला लोकांची फसवणूक केल्याचं फिलिंग काही जाता जात नाही"..
मी पण सुन्न झालो.. थोडंसं सावरून म्हटलं, "फसवणूक तू नाही, सरकार करतंय लोकांची.. चल तू, पीजी एन्ट्रन्सचा अभ्यास कर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कर म्हणजे ही MOship ची मगजमारी करावी लागणार नाही"..
असो..

काहीवेळा, खूप सारी वेगळी पण महत्वाची इंजेक्टबल्स उपलब्धच् नसतात.. मी RH ला इंटर्नशिप करत असतानाची गोष्ट आहे.. रात्री तीनच्या दरम्यान Acute asthmatic attack चा एक पेशन्ट टाचा घासून घासून माझ्याच पायाजवळ एक्सपायर झाला.. त्यावेळी त्याच्या बायकोचा टाहो आणि छोट्या मुलीचा चेहरा मला अजिबात बघवला नाही.. मी नवखा होतो.. प्रचंड भीती आणि दुःखाने मी गलितगात्र झालो.. आणि तोंड फिरवून दुसऱ्या वार्डमध्ये निघून गेलो..

त्यात, तिथं Aminophylline आणि इतर ड्रग उपलब्ध करून न देणाऱ्या सरकारची चूक होती?, का तिथं प्रयत्न करुन पण यश न देऊ शकलेल्या माझी चूक होती?, का दारिद्र्यामुळं सरकारी दवाखान्यात याव्या लागलेल्या त्या मजुराची चूक होती? हे तुम्हीच ठरवा..

पण त्या पहाटे मी शपथ घेतली.. की काहीही करायचं, पण सरकारी नोकरी मात्र अजिबात करायची नाही..
कारण, मी निगरगट्ट होऊच शकत नाही.. मी पेशंट्सच्या मजबुरीकडे त्रयस्थपणे बघूच शकत नाही.. मी हतबल जिणं जगूच शकत नाही..

सरकारला लोकांच्या आरोग्याशी काहीही घेणंदेणं नाही.. त्यांना गळ्यात स्टेथोस्कोप घालून लोकांसमोर फक्त एक माणूस उभा करायचाय.. खेडोपाड्यात आणि गावोगावात सार्वजनिक आरोग्याची अक्षरशः चेष्टा सुरू आहे.. सरकार लोकांची फसवणूक करतेय, आणि बोट डॉक्टरांकडे दाखवितेय..
म्हणजे, सरकारने डॉक्टरांना बॉर्डरवर बलाढ्य शत्रूसमोर उभे केलेय, आणि लढायला हातात निव्वळ चाकू सुरे दिलेत.. आणि पब्लिकला वाटतेय की डॉक्टरने आता आपलं रक्षण करावं..!!
कसं शक्य आहे सांगा..?

समाजातल्या प्रत्येकानं आपापल्या ओळखीतल्या किंवा मित्रातल्या कोणत्याही सरकारी डॉक्टरला सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल विचारावं.. सगळ्यांची तीच सेम गाऱ्हाणी असतील..  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीच परिस्थिती आहे..

MOship करणारा डॉक्टर काही दिवसांतच पागल होऊन जातो.. मग फक्त तो मिटींग्ज अटेंड करायला आणि कागदं रंगवायला शिकतो.. आणि कर्मचारी पाट्या टाकायला शिकतात.. सरकार योजना आणतं, सतराशे साठ अहवाल मागवतं, मिटींग्ज होतात, थोडंफार घडतं, थोडं बिघडतं.. साध्य काहीच होत नाही.. आणि वर्षोनुवर्षे हेच सुरू आहे..  कोणीही सुज्ञ माणूस त्या दुष्टचक्रातून लवकर बाहेर पडायचं बघतो.. किंवा मग मजबुरीने थांबतो..
का सरकारी डॉक्टर असा विचार करत असावा बरं?!! तो नालायक आहे म्हणून?? की तो कामचुकार आहे म्हणून??

आज परिस्थिती अशी आहे की समाजात कुठलीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी लोक लाखोंच्या बोली लावतात.. पण डॉक्टर्स मात्र सरकारी नोकरी करायला अजिबात तयार होत नाहीत..
का असावं बरं असं.?

डॉक्टर्स सरकारी नोकरी करत नाहीत म्हणून मग त्यांच्याविरुद्ध फतवे काढा, नियम बनवा, बॉन्ड कंल्पल्सरी करा.. डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारा.. मीडियातून नाचक्की करा.. पण स्वतःतच् खोट आहे, हे काही मान्य करू नका..!!
शासनाला स्वतःची सडलेली आणि भ्रष्ट सिस्टीम सुधारायची नाहीये.. त्यापेक्षा डॉक्टरांकडे बोट दाखविणे, त्यांना दोषी ठरविणे जास्त सोपे आहे..

काही सरकारी डॉक्टर आपापल्या परीने चांगली सेवा देत असतात.. वाखाणण्याजोगे काम करत असतात.. पण ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच्.. आणि त्यांना ह्या सिस्टीमला बायपास केल्याशिवाय ते शक्य होत नाही..
तरीही त्यांच्या हातात असलेल्या शक्य त्या गोष्टी ते करतात.. मेडिकल कॉलेज अटॅच् असलेल्या ठिकाणी निवासी डॉक्टर्स चोवीस तास कार्यरत राहतात.. हे तेवढेच काही आशेचे किरण..

कधी ऑपरेशन थिएटर असतं, पण उपकरणं नसतात.. कधी उपकरणं असतात, पण तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात.. सोयी सुविधांचा लपंडाव सुरु असतो..
काही असो वा नसो, सरकारी दवाखान्यात एक गोष्ट मात्र हमखास असते.. ती म्हणजे राजकारण्यांचा उपद्रव..!!
त्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल..

आणि ही परिस्थिती प्रत्येक सरकारी गोष्टीत, आस्थापनेत, विभागात आहे.. सरकारी शाळा असो, सरकारी वाहतूक असो, सरकारी कार्यालये, पोलीस, न्यायव्यवस्था, रस्ते, वीजमंडळ असो.. सरकारी यंत्रणांकडून सगळीकडेच् पब्लिकला गंडवलं जात आहे.. सगळ्या गोष्टी भ्रष्ट सिस्टीमने ड्रिव्हन आहेत..
पण यात केवळ आरोग्याच्या बाबतीत मात्र सरकार डॉक्टरांकडे बोट दाखविण्यात यशस्वी झालेय..
सरकारी शाळांच्या बाबतीत कधी शिक्षकांना मारहाण होत नाही, किंवा एसटी बसच्या खराब सेवेने ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण होत नाही.. पण सरकारी दवाखान्यात सुविधा नाही मिळाल्या तर डॉक्टरला बेदम चोपणाऱ्या समाजाला, एक टक्केही वाटत नाही की जाऊन आपल्या आमदाराला जाब विचारावा..!! हे आपले सामूहिक दुर्दैव आहे..

परदेशात जाऊन आलं की, या कोणत्या देशात अन् कसल्या समाजात आपण राहत आहोत याचं प्रचंड वाईट वाटतं.. वैयक्तिक पातळीवर स्वतःपुरत्या कितीही गोष्टी बदलायचा प्रयत्न केला तरी शक्यच होत नाही.. उलट आपणच् वेडे ठरतो.. प्रयत्न तोकडे पडतात..

सरकारी पातळीवरूनच् मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले पाहिजेत.. पण सरकारी अनास्था संपत नाही.. आपल्याला काँग्रेस किंवा बीजेपी तेच आलटून पालटून निवडावे लागतात, हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे..

आरोग्यविभागाच्या या अनागोंदीकडे आणि सरकारी हॉस्पिटलमधल्या सुविधांकडे पाहिलं तर पेशन्ट मरतात याचं आश्चर्य वाटतच नाही.. उलट पेशन्ट बरे कसे होतात, याचंच जास्त आश्चर्य वाटत राहतं..

इथल्या सरकारी दवाखान्यात शासकीय मर्डर होतात.. जिथं लाखो मुलं उपचाराअभावी आणि कुपोषणानं मरतात, लाखो शेतकरी आत्महत्या करतात, हजारो बेरोजगार जीव देतात, तिथं आम्ही मिरवणुका, होर्डिंग्ज, उत्सव, धार्मिक उन्माद आणि जातीय अस्मिता यातच् आपापले सौख्य सामावून घेतोय.. देशभक्तीचे कार्ड खेळायचे, का अवॉर्डवापसी करायची यातंच मशगुल राहतोय..

जिथं सरकारकडून काय मागावे, आणि सरकारने कशाला प्राधान्यक्रम द्यावा याची जराही अक्कल समाजाला नाही..
तिथं, कोवळ्या जीवांनो, तुम्ही जन्म घेतलात, हेच तुमचं दुर्दैव आहे.. ऑक्सिजन अभावी झालेली तुमच्या कोवळ्या जीवाची तडफड माझ्या मनातून जाणार नाही.. या देशातला माझ्यासकट प्रत्येक हतबल नागरिक तुमचा गुन्हेगार आहे..

**

Thursday, 27 July 2017

yogayog

yogayog

*भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला*.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
*पण कंपनीच्या लोकांनी* *विमानतळावरच घेरले*
*आणि भव्य सत्कार केला*.
सजवलेल्या गाडीत   बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
*साहेब आज इथ थांबा*.
*सगळ्यांचा आग्रह*.
*साहेब गाडीतून उतरले*.
*आजूबाजूचे लोक फुले उधळत होते*.
काय सांगाव ते कौतुक.......
       
*साहेब दरवाजा पर्यत आले*.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
*आणि* .
*विजे चमकावी तसे चमकले*....
*आणि*
*तक्षणी माघारी फिरले*. ...
*दरवाजा जवळ आले*...
*डोअर किपरने खालची मान वर केली* ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.

*आणि आणि* ...

*दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले*. .
*साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला*.
*आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले*....

बाबा.......बाबा

तुम्ही  इथे.....

*आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले*.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.

         
*आपल्या मुलाने परदेशी जावे*.
*मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता*.
ओव्हर टाईम करत होता.
*पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता*.
         
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.

       
*दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा*.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
       
*आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता*.

आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.

   
 *मला सांगा यात श्रेष्ठ कोण*

तो साहेब की तो डोअरकिपर

*तो आँफीसर की नोकर*

तो मुलगा की बाप....

     
*यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो*.

              तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
*पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही*.

हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
 राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
*त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही* ?

            आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
*आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप*.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
           *लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप*..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
*ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात*.

बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
*आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल*.

           ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
*पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत*.
  माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही *दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो*. *टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते*.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
*आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता*.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .

*मला जेव्हा विचारले जाते*

जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो

*जगात यशस्वी कोण* ?
*ज्याला आई बापाची कींमत कळाली तो*

जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

*जगात नालायक कोण*?
*ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले*.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.

*मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या* *मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात*
 खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
👆*तुम्ही हा मँसेज ३ गुरूप वर पाठवा👆👆
*वडिलांना समर्पित*💐

Monday, 24 July 2017

THE PERFECT LIFESTYLE"

*THE PERFECT LIFESTYLE"*

हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....

कायम तारुण्याचा अनुभव......

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.

2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.

3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.

4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.

5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.

5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.

6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.

7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8. 12.30 ला थोडे हलके जेवण.

9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.

10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.

11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.

12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.

★ या खबरदारी घ्या...

*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
 म्हणजे शंभर पावले चालणे....

 लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....

* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,

 पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.

* फक्त सिजनल फळेच खावी

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.

* डाव्याकुशीवर झोपावे.

* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

*** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
 वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.

संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।

health*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

*पोटचा गोळा*

" *पोटचा गोळा* "
--------------
लेकी कडून दुःख मला
कधीच नाही मिळालं
चिमणी कधी मोठी झाली
काहीच नाही कळालं........🙎🏻

                पोरगी जाणार म्हणलं की
                        पोटात उठतो गोळा
                अंथरुणावर पडतो पण
               लागत नाही डोळा.. .......👁👁

खरंच माझी लेक आता
मला सोडून जाईल
अंगण , वसरी , गोठा सारं
सूनसून होईल......🏘🏞🐄🐿🕊

                    दारी सजतो मांडव
                    पण उरात भरते धडकी
                आता मला सोडून जाणार
         माझी चिमणी लाड़की.........👳🙋🏼

सूर सनई चे पडता कानी
डोळा येते पाणी 🎺🥁
आठवत राहातात छकुलीची
बोबडी बोबडी गाणी...........👭💇🏻💅

                  भरलेल्या मांडवात बाबा
                  कहाणी सांगत असतात
           कल्याण झालं म्हणत-म्हणत
            सारखे डोळे पुसतात.........
पुन्हा पुन्हा लेकी कडे
बाबा पहातात चोरून
कितीही समजूत घातली तरी
डोळे येतात भरून...........

            हुंदके म्हणजे काय असतात
                        पहिल्यांदाच कळतं
              कौलारूच्या छपरावनी
              बापाचं मन गळतं.......🏘
सरी मागून सरी येऊन
डोळे वाहात राहतात
चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत
चिमण्या उडून जातात...🕊🐣🐥🕊

            लेकीचा सांभाळ करा म्हणून
                   बाप हात जोडीत राहतो 🙏🏼
                डोळ्या मधे पाणी आणून
      केविलवाणे पहात रहातो........☹
लेक लावतो वाटी पण
बाप जातो तुटून
हुंदका जरी दाबला तरी
काळीज जातं फुटून..........😒

                पोटचा गोळा दिल्या नंतर
                 पापणी काही मिटत नाही
                 कितीही डोळे पुसले तरी
           पाणी काही आटत नाही.......😥
💐💐💐💐💐
आई बापाच्या पोटचा गोळा सर्व मुलींसाठी सम्रप्रित.

मोदी-ट्रंप भेटीत शिजले काय?

मोदी-ट्रंप भेटीत शिजले काय?

अत्यंत महत्वाच लेख आहे, अवश्य वाचा



दोन देशातील संबंध आणि परराष्ट्र व्यवहार हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असतो. म्ह णूनच त्यात मुत्सद्दी लोकांचा वावर जास्त असतो. अशी माणसे अत्यंत गोंडस भाषेत व शब्दात खुप काही बोलतात, पण साध्या सोप्या भाषेत आपल्याला त्यांनी कथन केलेल्या गोष्टींचा अजिबात उलगडा होत नाही. आताही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौर्‍यावर जाऊन आले, त्यापैकी अमेरिकेत त्यांचा अधिक मुक्काम होता. तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना सन्मानपुर्वक मेजवानी दिलेली आहे. सहाजिकच त्यावरून अनेक उलटसुलट गोष्टी बोलल्या गेल्या. मोदींची ही अमेरिका भेट पाकिस्तानची कोंडी करणारी आहे. चीनला त्यामुळे मिरच्या झोंबलेल्या आहेत. जगात भारताची पत वाढलेली आहे. भारताला अमेरिकेशी इतकी जवळीक परवडणार आहे काय? आजवर इतका कुणा भारतीय नेत्याचा अमेरिकेत सन्मान झालेला आहे वा नाही? अशा अनेक गोष्टी बोलल्या व चर्चिल्या गेल्या. पण ज्या मोदी-ट्रंप भेटीविषयी एकूणच माध्यमातून अखंड गाजावाजा चालला होता, त्यातून काय निष्पन्न झाले, त्याचा कुठलाही सविस्तर तपशील बाहेर आलेला नाही. अमेरिकन लढावू विमाने भारताला मिळणार वा अन्य शस्त्रास्त्रांचा पुरवठा होणार, यासाठी अमेरिकेचा अध्यक्ष भारताच्या पंतप्रधानाला आपल्या आलिशान महालात बोलावून मेजवानी देत नसतो. असे व्यवहार व करार अन्य मंत्री वा अधिकारी पातळीवरही होऊ शकतात. पाच तास दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांना एकांतात बोलण्याची गरज नसते. पण इथे तसे काही घडलेले आहे. त्यामुळेच मोदी-ट्रंप भेटीचे रहस्य अधिक गडद झाले आहे. तसे नसते तर त्यामुळे आपला मोठा शेजारी चिन इतका बेचैन झाला नसता. या भेटीत आपल्या वर्चस्वाविरुद्ध काही शिजलेले आहे वा शिजवण्याचा बेत आहे, अशी चीनची समजूत उगाच झालेली नाही. पण नेमके शिजले काय?

अशा बाबतीत नेहमी तुकड्यांमध्ये बातम्या येत असतात. एकाच बातमी वा लेखातून अशा गुंतागुंतीचा उलगडा होऊ शकत नसतो. विखुरलेल्या बातम्यांचे तुकडे एकत्र करून सुसंगत मांडण्याचा प्रयास केला, तर यातले रहस्य हळुहळू उलगडू लागत असते. मोदींना ट्रंप यांनी खास आमंत्रण देऊन मेजवानी दिली. त्यानंतर आठवडाभरातच भारताचा हा पंतप्रधान इस्त्रायलच्या भेटीला जाणार आहे. इस्त्रायलच्या बाबतीत भारताने सात दशकाच्या काळात अलिप्तता बाळगलेली आहे. त्यामुळेच पहिलावहिला भारतीय पंतप्रधान इस्त्रायल भेटीला येत असल्याचे, त्या देशाला मोठे कौतुक आहे. अन्यथा तिथल्या मोठ्या माध्यमांनी त्याचा इतका गाजावाजा केला नसता. पर्वणीच असल्यासारखे मोदींचे स्वागत करायला तो देश उतावळा झालेला आहे आणि सौदीसारख्या अरबी देशाशी मैत्री राखून मोदी इस्त्रायल भेटीला जात आहेत. शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातले सर्वाधिक प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केलेला देश म्हणून आज इस्त्रायलची ओळख आहे. त्यामुळेच अमेरिका भेटीनंतर मोदींनी इस्त्रायलच्या दौर्‍यावर जाण्याला महत्व प्राप्त झालेले आहे. दोन शस्त्रसंपन्न व तंत्रज्ञान प्रगत देशांच्या या लागोपाठच्या दौर्‍यातून भारत काय साधू बघतो आहे, त्याचे उत्तर चिनच्या वैतागात सापडू शकते. भारत शस्त्रास्त्रांच्या व लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ करतो आहे, असाच त्याचा अर्थ चीनने लावलेला नसता, तर इतकी चिडचिड त्या देशाकडून झाली नसती. अमेरिका १९६२ च्या युद्धातही भारताच्या मदतीला आलेली नाही, असा तब्बल अर्धशतकापुर्वीचा जुना इतिहास चिनी मुत्सद्दी आज कशाला सांगत आहेत? पाच वर्षापुर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही अमेरिकेला भेट देऊन आले होते. पण चीनने त्याची अशी दखल घेतलेली नव्हती. मग आताच मोदींच्या अमेरिका भेटीने चिनला अस्वस्थ होण्यासारखे काय घडले आहे?

परराष्ट्र संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण एकमेकात गुंतलेले विषय असतात. त्यात एका देशाशी भारताने मैत्री केली तर दुसर्‍या देशाच्या पोटात दुखत असते. तर एक मित्र देश त्याचवेळी आपल्या शत्रू देशाचाही मित्र असू शकतो. सहाजिकच शत्रू देशाचा मित्र म्हणून मित्र असलेल्या देशाला टाळून चालत नाही. त्यातून आपले हित व स्वार्थ साधून घ्यायचे असतात. दिर्घकाळ अमेरिकेने पाकिस्तानला मित्र म्हणून जवळ बाळगलेले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात ती अमेरिकेची गरज होती. अलिकडे पाकची तितकी उपयुक्तता अमेरिकेला राहिलेली नाही. कारण आता मध्यपुर्व आशियाचे राजकारण बदलले आहे. राजकीय संदर्भही बदललेले आहेत. चीन व दक्षिण आशियातील राजकारणाचा भूगोल पुर्वीचा राहिलेला नाही. दुसरीकडे अमेरिकेची प्राधान्येही खुप बदलून गेलेली आहेत. अशा कालखंडात दोनतीन दशकापुर्वीचे मित्र व शत्रू देश यातही आमुलाग्र बदल होऊन गेला आहे. आज जगाच्या नकाशावर इस्लामिक दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या झालेली आहे आणि मध्यपूर्वेतील इस्त्रायल अरब ही समस्याही पुर्वीसारखी राहिलेली नाही. त्या समस्येची जागा आता वहाबी इस्लामचे रौद्ररूप आणि त्यातला बेबनाव, अधिक शिया सुन्नी संघर्ष विकोपास गेलेला आहे. त्यात काही प्रसंगी इस्त्रायलशी सौदी अरेबियाने हातमिळवणी केली आहे आणि पॅलेस्टाईन तर जग विसरूनच गेलेले आहे. अशा स्थितीत जगाकडे बघण्याचे राजकारणच आरपार बदलले आहे. रशिया पुन्हा नव्याने उभा राहिला असून, दरम्यान चीन नवी महाशक्ती म्हणून उदयास आला आहे. तर त्याला भारतही महाशक्ती होतो अशा भितीने पछाडले आहे. अशा गुंत्यामध्ये प्रत्येक देशाला नव्याने आपले स्वार्थ व हित शोधायचे आहे. सहाजिकच आजवरचे राजकीय संदर्भ आणि मैत्री वा शत्रूत्व कायम राखून चालत नाही. मैत्री व शत्रुत्व यातली रेषा अस्पष्ट होत गेली आहे.
हा काळाचा बदल पाकिस्तानला ओळखता आलेला नाही. म्हणून तो देश अधिकाधिक अराजकाच्या मिठीत गेला आहे आणि प्रादेशिक मतलबासाठी त्याची पाठराखण करताना चीनला अधिकाधिक अडचणीत यावे लागते आहे. अफ़गाणिस्तान या देशात अधिक काळ सैन्य ठेवणे अमेरिकेला शक्य उरलेले नाही. पाकिस्तानलाही पोसणे अशक्य झाले आहे. अशा अनेक बाबी लक्षात घेतल्या, तर मोदी-ट्रंप यांच्या भेटीचे काही मुद्दे नजरेत येऊ लागतील. इराणशी अमेरिकेचे वैर संपलेले नाही. पण त्याच देशाशी भारताचे चांगले संबंध आहेत. अधिक शिया सुन्नी वादात भारताने इराणला एकाकी पडू दिलेला नाही. कारण पाकविरोधी डावपेचात इराणला कायम मित्र राखून भारताने प्रादेशिक समतोल राखला आहे. आता तर इराण, अफ़गाण व भारत यांनी दिर्घकालीन व्यापार व्यवस्था उभारण्याची रणनितीच आखलेली आहे. त्यामुळे पाक व चीन यांनी योजलेली ग्वादार बंदर व चिन अरबी समुद्र जोडण्य़ाची महत्वाकांक्षी योजना निरूपयोगी होऊ घातली आहे. हे बंदर व त्याला थेट मध्यचीनशी जोडाणारा महामार्ग आसपासच्या अन्य लहानमोठ्या देशांनाही वरदान ठरेल, अशी चीनची अपेक्षा होती. त्यातून त्या शेजारी देशांना आपल्यावर अवलंबून ठेवताना वर्चस्व स्थापन करण्याचे धोरण होते. पण इराणच्या चबाहार बंदराचा विकास करतानाच भारताने अफ़गाण पाक सीमेलगत मोठा महामार्ग बांधून काढल्याने चिनच्या पश्चीमेस आहेत, त्या मध्य आशियाई देशांना पर्याय मिळाला आहे. सहाजिकच चिनच्या अफ़ाट गुंतवणूकीतून उभारलेला ग्वादारचा महामार्ग तितका लाभदायक उरलेला नाही. अधिक तिथे बलुची व पश्तुनी घातपाती घटनांनी योजनेत व्यत्यय येत आहेत. अशावेळी पाकला कोंडीत पकडण्याचे मोदी-ट्रंप यांचे हेतू चीनला विचलीत करून गेल्यास नवल नाही. कारण चबाहार बंदराच्या पर्यायाने चिनच्या एकूणच महत्वाकांक्षी योजनेला सुरूंग लागला आहे.

मोदीभेटीच्या आदल्याच दिवशी ट्रंप यांनी काश्मिरी घातपाताचा नेता व हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. त्याच दरम्यान पाकला बिगर नाटो मित्र म्हणुन असलेला दर्जा काढून घेण्याचे विधेयक अमेरिकन संसदेत सादर करण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस या अध्यक्षीय निवासस्थानी मोदींना मेजवानी, म्हणजे चीन-पाकला मोठा शह देण्य़ाचा घाट असणार हे चीनला समजू शकते. त्याचा तपशील आ्ज त्याच्याकडेही नसेल. पण चीनला राजकीय व आर्थिक शह देण्यासाठीच अमेरिकेला भारताशी मैत्री करायची आहे, हे चीन ओळखू शकतो. म्हणून चिनी माध्यमात अमेरिका हा दगलबाज मित्र असल्याचा प्रेमळ सल्ला भारताला देण्यात आला आहे. त्यामागे चीनची सगळीकडून होणारी कोंडी हेच खरे कारण आहे. पण त्याहीपेक्षा मध्य व पश्चीम आशियामध्ये आपला विश्वासू मित्र म्हणून अमेरिका भारताला पुढे करण्याचा डाव खेळत असल्याची भिती त्यामागे असू शकते. उदाहरणार्थ आज पश्चीम  आशियात जे शिया सुन्नी रणकंदन माजले आहे, त्याचे दोन मुस्लिम देश नेतृत्व करीत आहेत. त्या इराण व सौदी अशा दोन्ही देशांशी मोदींनी छानपैकी मेत्री राखून दाखवलेली आहे. त्यामुळेच त्या दोन देशांना एकत्र आणून मध्यस्थ म्हणून तडजोडीची जबाबदारी आज भारत सहज उचलू शकतो. त्यात अमेरिका व रशिया भिन्न गटात अडकले आहेत आणि चीनला इराण वा सौदीशी जुळवून घेता आलेले नाही. अशा वेळी तटस्थ म्हणून मित्र असलेल्या भारताला या धुमसणार्‍या पश्चीम आशियाई भांडणात हस्तक्षेप करायची कामगिरी बजावणे अवघड नाही. किंबहूना हाताबाहेर गेलेली ही समस्या सोडवण्यासाठीच अमेरिकेला भारताची मदत हवी आहे. त्यात भारत यशस्वी झाला, तर चीनचे मध्य व पश्चीम आशियातील महत्व कमी होऊन जाईल.

अर्थात अशा दिशेने कोणते निर्णय या दोन राष्ट्रांच्या बोलण्यातून झाले, त्याचा फ़ारसा गोषवारा समोर आलेला नाही. त्याचेही कारण आहे. मुत्सद्देगिरी म्हणजे नोलले खुप जाते, पण त्यातून सांगितलेले खुप कमी असते. कारण मनातले ओठावर न आणण्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. जे काही ठरले असेल, त्याविषयी कमालीची गुप्तता राखण्यातच रणनिती व मुत्सद्देगिरी यशस्वी होत असते. जेव्हा त्याचे परिणाम दिसू लागतात, तेव्हाच जगाला त्यामागची योजना उलगडत जात असते. अशा योजना वा त्यामागचे हेतू आधीच जाहिर केले, तर अन्य मित्र वा शत्रू त्यात खोडा घालण्याचेही उपाय योजण्याचा धोका असतो. म्हणून गोपनीयतेला प्राधान्य असते. मोदी-ट्रंप बैठकीत काय शिजले, त्याचे तपशील म्हणूनच जाहिर करण्यात आलेले नाहीत. दोन देशातील मैत्री, व्यवहार व्यापार किंवा खरा मित्र असली भाषा फ़सवी असते. ती मित्र व शत्रूंची दिशाभूल करण्यासाठीच असते. भारताची पश्चीम मध्य आशियात कुठली मदत अमेरिकेला हवी आहे, त्याचा खुलासा आजच झाला तर इराणसारखा मित्र त्याला राजी असेल असेही नाही. किंबहूना अमेरिकेला परस्पर लाभ होईल, असे कुठलेही कृत्य इराण करणार नाही वा त्यात अडथळा आणू शकेल. म्हणूनच शत्रू व मित्र अशा दोन्ही बाजूंना गाफ़ील राखण्याला मुत्सद्देगिरीत महत्व असते. पण काही बाबतीत मुद्दाम मोठा आवाज करून बोलावे लागते. सलाहुद्दीन याला दहशतवादी म्हणून जाहिर करणे वा पाकची मदत कमी करण्याचा विषय; म्हणूनच मोठ्या आवाजात बोलला जातो. उलट खरे हेतू झाकून ठेवले जातात. त्याचे धागेदोरे संदर्भातून शोधावे लागतात. म्हणूनच अमेरिका भेटीनंतरची मोदींची गाजणारी इस्त्रायल भेट जोडून बघावी लागते. त्यातून भारताला मध्य व पश्चीम आशियात यापुढे महत्वपुर्ण राजकीय भूमिका पार पाडायची आहे, याची चाहूल लागते.

चीनपाशी भरपूर पैसा आहे आणि त्याने खुप विकास केला आहे असे चित्र उभे केले जाते. पण वास्तविकता भलतीच आहे. पुर्वेकडील चिनी आर्थिक प्रगतीचा मागमूस पश्चीम चिनमध्ये आढळून येत नाही. त्यासाठीच चीनने पाकिस्तानच्या ग्वादार बंदर विकास व थेट अरबी समुद्राला जोडाणार्‍या महामार्गाच्या योजनेवर अफ़ाट गुंतवणूक केलेली आहे. त्याला आता मोठा शह मिळालेला आहे. त्यामुळे गुंतलेला पैसा मोठ्या प्रमाणात अडकून पडला व त्याचे अपेक्षित लाभ गडबडले आहेत. त्याचा चीनने इतका धसका घेतला आहे, की पाकप्रमाणे चीनही कुरापतीच्या मार्गाकडे वळला आहे. सिक्कीममध्ये सीमेवर चिनी सेनेने केलेली घुसखोरी व मानसरोवराला जाणार्‍या यात्रेकरूंची केलेली अडवणूक चिनच्या अस्वस्थतेचा पुरावा आहे. अकस्मात अशा यात्रेत बाधा आणणे वा अन्य मार्गाने भारताला इशारे देण्याची चीनची भाषा, वेगळे संकेत देणारी आहे. चार दशकापुर्वी निक्सन माओ भेटीने जगाचे राजकारण बदलून गेले होते आणि आता थोड्याफ़ार फ़रकाने तशीच एक गोपनीय बैठक मोदी-ट्रंप यांच्यात झालेली अहे. तिचा तपशील गोलमाल आहे. त्यामुळेच त्यात भविष्याचे कोणते डाव झाकलेले आहेत, ते आज सांगता येणार नाही. पण यात दिर्घकालीन राजकारणाची रणनिती आखण्यात आलेली असल्याची चिनची शंका रास्त वाटते. पाकसोबत चीनला एकाकी पाडणे, मध्य पश्चीम आशियात भारताचे प्रस्थ वाढवणे आणि दक्षिण आशियात चिनची आणखी कोंडी करणे; अशी त्याची मांडणी असेल तर त्याला चीनने व पाकने घाबरणे अपरिहार्य आहे. त्यात चीनला लगाम लावणे हा अमेरिकेचा स्वार्थ असणार. तर पाकला पुरते नामोहरम करून टाकणे, ही भारताची गरज आहे. त्यातून अशी मैत्री साकार होत असते. ज्यात परस्पर मतलब साधले जात असतात. त्याची जाहिरात कामाची नसते तर हेतू साध्य होण्याला प्राधान्य असते.
जयतु हिंदुराष्ट्रम् 

Sunday, 30 April 2017

Jaibhim.

Jaibhim.
On 10th  Oct 2015, the  Chief Information Commissioner of Maharashtra Ayu.Ratnakar Gaikwad issued landnark order on atrocities related  Information in public domain and all district Suptd of Police were ordered to place information related to atrocities (Human Rights Violation )on SC-ST -Buddhist  on their district websites.

Accordingly Following 35 city and district police   have placed information on their websites.

1. NANDED DISTT:
 https://drive.google.com/file/d/0B3QwW0bfj-zgT0xsSFo3YXdNTnpCUE12bjZQYTlYNWd6dkMw/view

 2. NAGPUR CITY:
 http://nagpurpolice.info/atrocity-act

3 to 11. NINE  DISTRICTS :(consolidated information)
 Mumbai city (2distt),Ratnagiri,Sindhudurg,Jalna,
Wardha,Gadchiroli,Kolhapur,Nandurbar,
Beed

  http://www.mahapolice.gov.in/mahapolice/jsp/temp/Case%20registered%20under%20poa%20&%20pcr%20act%20from%202000%20to%20nov%202015.jsp

 12. BHANDARA DISTT:
 http://bhandarapolice.org/crime_against_st_sc

13. GONDIA DISTRICT:
 http://gondiapolice.gov.in/?cat

 14. NASHIK DISTRICT:
 http://www.nashikruralpolice.gov.in/Atrocity.html

15. DHULE DISTT:
 http://dhulepolice.gov.in/welcome/sct

16. SANGLI DISTTICT:
 http://www.sanglipolice.org/sanglipolice_html_files/downloads.htm

17. PALGHAR DISTT:
 http://palgharpolice.gov.in/SC_ST%20Cases.html

18. NAVI MUMBAI DISTT:
http://navimumbaipolice.org/cases-registered-under-atrocity-act/

19. PUNE DISTT:
  http://www.puneruralpolice.gov.in/download_forms_for_licenses

20. YAVATMAL DISTT:
 http://www.yavatmalpolice.gov.in/download.php

21. AMRAVATI City:
 http://www.amravaticitypolice.org/atrocity_act

22. AMRAVATI DISTT:
 http://amravatiruralpolice.in/download.html

23. WASHIM DISTT:
 http://www.washimpolice.org/

24. AURANGABAD DISTT:
 http://www.aurangabadruralpolice.gov.in/poa.php

25. AURANGABAD city:
 http://aurangabadcitypolice.gov.in/

26. RAIGAD DISTT:
 http://raigadpolice.gov.in/pdfdocs/Attrocity-cases-01012016.pdf

27. HINGOLI DISTT:
 http://www.hingolipolice.org/index.php?page=attrocityInfo

28. THANE DISTT:
 http://googleweblight.com/?lite_url=http://www.thaneruralpolice.org/Atrocity.html&lc=en-IN&s=1&m=836&host=www.google.co.in&ts=1478609892&sig=AF9NednJzn0WocthNRBRHv38_9Vwkc8Deg

29. LATUR DISTT:
 http://www.laturpolice.com/pages/crimeinfo.php

30. OSMANABAD DISTT:
 http://osmanabadpolice.gov.in/page/crime-info

31.  NAGPUR DISTT:
 https://nagpurgraminpolice.gov.in/atrocities-case-status.php

32.  SATARA DISTT:
 http://www.satarapolice.gov.in/poapcr

33. CHANDRAPUR DISTT:
 http://chandrapurpolice.gov.in/flash/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa/

34. SOLAPUR DISTT:
 http://solapurcitypolice.gov.in/poapcr
35.PUNE DISTT POLICE:

http://puneruralpolice.gov.in/download_forms_for_licenses

Kindly click to you respective district link and go through all available information and form your strategy to help victims of atrocities and human rights violations.

We have filed a fresh complaint with CIC Maharashtra  in June 2016 for noncompliance or inadequate compliance by Maharashtra police.

Any further development will be communicated
pawarstudycenter@gmail.com